Home अहमदनगर हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, तीन मुलींची सुटका

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, तीन मुलींची सुटका

Ahmednagar News Police raid hotel brothel

अहमदनगर | Ahmednagar News: खंडाळ गावाच्या शिवारात नगर दौंडवरील हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकत तीन परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे.  

कुंटणखाना चालविणाऱ्या बाप लेकाना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली आहे.  

अनिल माणिकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25 दोघे रा. खंडाळा ता.नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडाळ गावाच्या शिवारात हॉटेल राजयोगमध्ये परप्रांतीय मुलींना देहविक्री करण्यासाठी बोलावून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. निरीक्षक सानप यांच्या पथकाने छापा टाकत. या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठविण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar News Police raid hotel brothel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here