Home अहमदनगर नगर जिल्ह्यातील निर्बंधाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा काय सुरु अन काय बंद

नगर जिल्ह्यातील निर्बंधाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा काय सुरु अन काय बंद

Ahmednagar News Collector gr today

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात दिली आहे. मात्र दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी यांचे लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे.

हॉटेल व्यावसायिकांना ५० टक्के आसन क्षमतांची अट ठेवण्यात आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षाकक्षात अथवा जेवण मिळेपर्यंत मास्क वापरणे अनिवार्य राहील. जिम, योगासेंटर, सलून,इनडोअर खेळ व सर्व शासकीय कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. विवाह सोहळा मात्र ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादा असणार आहे. सिनेमागृहे, धार्मिक स्थळे उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.

उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल,

उपहारगृह/बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.

उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसार उपहारगृहे / बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे.

सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

Web Title: Ahmednagar News Collector gr today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here