Home अकोले १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरणात इतके टक्के पाणीसाठा

१५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरणात इतके टक्के पाणीसाठा

 

water storage in Bhandardara dam

अकोले | Bhandardara Dam: उत्तर नगर जिल्ह्यातील संजीवनी असलेले भंडारदरा धरण घडत असलेल्या परंपरेनुसार १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची अशा आता धूसर बनत आहे.

नगर विभागातील सहा तालुक्यांसाठी संजीवनी असलेले भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वी भरत असते. मात्र पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी आहे. तसेच तीन आठवड्यापासून पावसाने डोळेझाक केल्याने भंडारदरा धरण भरण्याविषयी काही प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्ष धरण भरण्याची परंपरा खंडित होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

सध्या भंडारदरा, मुळा व निळवंडे या प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश खरीप पिक नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. भंडारदरा धरणात ९ हजार ७०३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ८८ टक्के, निळवंडे धरणामध्ये ५ हजार ३१० दशलक्ष घनफूट म्हणजेच ६४ टक्के व मुळा धरणात १७ हजार ६२४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६८ टक्के पाणीसाठ्याची स्थिती आहे. आढळा व म्हाळुंगी नदीच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. आढळा धरणात ४९ टक्के तर भोजापूर धरणात १५ टक्के इतकाच पाणीसाठा यावर्षी झालेला आहे.  

Web Title: water storage in Bhandardara dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here