Home क्राईम संगमनेरातील ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनीच चोरीचा बनाव करत त्यांनाच लुटले १२ लाखास

संगमनेरातील ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनीच चोरीचा बनाव करत त्यांनाच लुटले १२ लाखास

Sangamner crimes 12 lakh was looted by the contractor's employees

संगमनेर | Sangamner Crimes: शहरातील प्रतिष्ठित ठेकेदार के. के. थोरात यांची त्यांच्याच संगमनेर कार्यालयात  काम करत असणाऱ्या कामगारांनी 12 लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा बनाव करीत ही रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला,  मात्र चाकण पोलिसांनी हा बनाव हाणून पाडत या कर्मचार्‍यांना अटक केली आहे.

संगमनेरवरून चाकण येथे जात असताना चोरीचा बनाव करण्यात आला मात्र चाकण पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला आहे.  ठेकेदार के. के. थोरात यांच्या कार्यालयातील हे कर्मचारी संगमनेरहून चाकणकडे 12 लाख रुपयांची रक्कम घेऊन जात होते. चाकण येथे मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी कट मारला आणि झालेल्या वादावादीत गाडीतील 12 लाखांची रक्कम चोरुन नेल्याचा बनाव केला. चाकण पोलिसांनी  पुणे-नाशिक महामार्गावर सीसीटीव्ही फुटेज आणि संगमनेरमध्ये येऊन आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवत हा बनाव असल्याचे लक्षात येताच त्यांना अटक केली.

पुणे येथे कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी एम एच 17 बी एक्स 7676 या गाडीतून ही रक्कम घेऊन जात असताना ठेकेदार के. के. थोरात यांच्याच कामगारांनी लुटमारीचा बनाव रचत मोटरसायकलवर आलेल्या दोघा जणांनी ही रक्कम चोरून नेल्याची माहिती ठेकेदार थोरात यांनी चाकण पोलिसांना दिली मात्र चाकण पोलिसांनी संगमनेर मध्ये दोन दिवस राहून या आरोपींच्या हालचालीवर पाळत ठेऊन त्यांनी ही रक्कम चोरली असावी असा संशय व्यक्त करत त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी समीर ज्ञानेश्वर सोनवणे, अक्षय पूजा सोनवणे, प्रदीप सुनील नवाळे, सुरेश दादा गायकवाड (सर्व राहणार संगमनेर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून ११ लाख रुपये आणि शाईन मोटरसायकल (एम एच 17 ई सी 8565) जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Sangamner crimes 12 lakh was looted by the contractor’s employees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here