नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेले तब्बल कोट्यावधी रुपयांचं सोन बनावट
अहमदनगर | Ahmednagar News: नगर अर्बन बँकेत शेवगाव शाखेत तारण ठेवलेले सोने याची बुधवारी नगर येथील मुख्य शाखेत लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. लिलाव प्रक्रिया करताना पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाले. त्यामुळे सहभागी झालेले सराफ तेथून निघून गेले. लिलाव बाकी असलेले कोट्यावधी रुपयांचे सोने बनावट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारी लिलाव करण्यसाठी ३६४ पिशव्या आणण्यात आल्या होत्या. तारण ठेवलेल्या या सोन्यावर बँकेने कोट्यावधी रुपयांचे कर्ज देण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात बनावट सोन्याच्या माध्यमातून कर्ज दिले गेलेले आहे. त्यामुळे अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचा सोनेतारण अपहार समोर आले आहे.
दरम्यान या सर्व सोन्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी सभासदांनी संताप व्यक्त केला आहे.
Web Title: Ahmednagar News Counterfeit gold worth crores of rupees pledged in Nagar Urban Bank