Home अहमदनगर पारनेर सहकारी कारखान्याच्या खरेदीची ईडीकडून चौकशी सुरु

पारनेर सहकारी कारखान्याच्या खरेदीची ईडीकडून चौकशी सुरु

Ahmednagar News ED launches probe into Parner co-operative factory purchase new

अहमदनगर | Ahmednagar News: पारनेर साखर कारखाना क्रांती शुगरने विकत घेतला आहे. त्याची विक्री कशा पद्धतीने झाली. क्रांती शुगरकडे कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कशा पद्धतीने आले याची चौकशी इडीने सुरु केली असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्य्या यांनी दिली.

कारखाना विक्रीच्या विरोधात कारखाना बचाव समितीचे प्रमुख साहेबराव मोरे, रामदास घावटे, बबन कवाद यांनी लढा सुरु केला असून कारखाना विक्री व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत चौकशीसाठी इडीकडे धाव घेण्यात आली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी लक्ष घातले आहे. गुरुवारी त्यांनी येऊन कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. कामगार सभासद, शेतकऱ्यांची त्यांनी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी कामगार सभासद या न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहोत. गरिबांच्या जीवावर कोणी बंगले बधणार असेल, लखपती होणार असेल, न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसविला जाणार असेल, कारखाना बळकाविण्याचा प्रयत्न करीत असेल तर चुकीचे आहे. कारखान्यात जा घोटाळा झाला असेल तर त्या पैशांचा हिशोब घेऊन ते पैसे शेतकरी व कामगार यांच्या खात्यावर जमा व्हायला हवेत. न्यायालयाने चौकशी आदेश दिले आहेत. कामगारांना अडचणीत आणणार नाही असे ते यावेळी म्हणाले.

Web Title: Ahmednagar News ED launches probe into Parner co-operative factory purchase

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here