जिल्ह्यातील या भाजप नेत्याचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
कर्जत | Ahmednagar: कर्जत तालुक्यातील भाजपचे नेते, उपनगराध्यक्ष नामदेव राउत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या समर्थकांसह मुंबईत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे उपस्थित होते.
नामदेव राउत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जामखेड तालुक्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादीत आला आहे. तसेच या अगोदरही कर्जतचे नगरसेवक राष्ट्रवादीत आलेले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
तसेच गुरुवारी नगरसेविका उषा राउत, हर्षदा काळदाते, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, अमृत काळदाते, किरण पाटील, महादेव खंदारे, बजरंग कदम, उमेश जपे, मंगेश नेवसे, धनंजय थोरात यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Web Title: Ahmednagar Namdeo Raut entry in Ncp