Home अहमदनगर जिल्ह्यात या लॉजवर छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, व्यवस्थापक अटकेत

जिल्ह्यात या लॉजवर छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, व्यवस्थापक अटकेत

Ahmednagar News Exposing the prostitution business

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. शहरातील महेश चित्रपट गृहाजवळील एका हॉटेलमधील लोजवर वेश्या व्यवसाय सुरु असताना शुक्रवारी रात्री तोफखाना पोलिसांनी या लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. लॉज व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे.

गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकाला. यावेळी लॉजमध्ये एक नगरची तर दुसरी मुंबई येथील महिला आढळून आली. त्यांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.

दरम्यान हा लॉज राजकीय नेत्यांच्या संबधित असल्याचे सांगण्यात येते. तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web TItle: Ahmednagar News Exposing the prostitution business

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here