संगमनेर घटना: पैशाच्या वादातून कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न, पाच वर्ष कारावास
संगमनेर | Crime News: पैसे देणे घेण्याच्या वादातून दोघांत वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबर २०१८ ला निमगाव जाळी येथे घडली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास जिल्हा न्यायाधीश एस. घुमरे यांनी पाच वर्षाचा कारावास तसेच १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणातील दोघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
सतीश दशरथ अरगडे वय ३४ रा. निमगाव जाळी ता. संगमनेर असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय शिवाजी वदक व शोभा शिवाजी वदक या या दोघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी संभाजी सुखदेव अरगडे यांनी फिर्याद दाखल केली होती. २०१७ ला त्यांचे बंधू शिवाजी अरगडे यांच्याकडून १० हजार रुपये व्याजाने घेतले होते. सतीश अरगडे हा त्यांच्याकडे वाढीव व्याजाची मागणी करत असताना त्यांच्यात वाद झाले होते.
दिनांक ५ सप्टेंबर २०१८ ला सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास निमगाव जाळी शिवारात सतीश अरगडे याने शिवाजी अरगडे याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवाजी अरगडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्नालायात उपचार सुरु होते. आश्वी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.
Web Title: Crime News Attempt to kill with a scythe over a money dispute