Home अहमदनगर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेसोबत घडले असे काही

पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेसोबत घडले असे काही

Ahmednagar News happened to a woman who went for a morning walk

पारनेर | Ahmedngar News: पारनेर तालुक्यातील भाळवणी-जामगाव रोड परिसरात पहाटे (मॉर्निंग वॉक) फिरायला गेलेल्या शैला दत्तू भोसले या महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर टणक हत्याराने वार करत जखमी करण्यात आले. यामुळे  असून पहाटे फिरायला जाणार्‍या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज पहाटे गावातील पुरुष, महिला, तरुण गावालगतच्या जामगाव रोड, टाकळी ढोकेश्वर रोड, नगर रोड परिसरात फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जात असतात. दररोजच्या प्रमाणे भोसले या पहाटे जामगाव रोड परिसरात फिरण्यासाठी गेल्या असताना अंधाराचा फायदा घेत अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करत  जखमी केले. अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे फिरायला जाणार्‍यां ग्रामस्थांमध्ये  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Ahmednagar News happened to a woman who went for a morning walk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here