Home Suicide News लसीकरण सुरु असताना कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्याने घेतला गळफास

लसीकरण सुरु असताना कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्याने घेतला गळफास

Ahmednagar news health officer in the office choked when the vaccination started

पाथर्डी | Ahmednagar News: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टरने लसीकरण सुरु असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

डॉ. गणेश शेळके असे या आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. डॉ. गणेश शेळके बहिरवाडी ता. नेवासा येथील रहिवासी होते. करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. करंजी येथे उपकेंद्रात मंगळवारी लसीकरण सुरु होते. त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे जाणवत होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना कागद व पेन मागितला व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही दरवाजा उघडला गेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि दरवाजा तोडून आत पहिले असता डॉ, गणेश शेळके यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतीश खोमणे हे घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.  

Web Title: Ahmednagar news health officer in the office choked when the vaccination started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here