Home अहमदनगर लष्करातील जवानाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत  केला बलात्कार

लष्करातील जवानाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत  केला बलात्कार

young woman was lured into marriage and rape

पारनेर | Rape case: गेल्या ३ वर्षात एका २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करत, लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्चेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पारनेर पोलीस ठाण्यात अनिल गंगाधर नांगरे रा. गोरेगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल याने मार्च २०१८ ते २९ जून २०२१ या दरम्यान तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद केले आहे.

पिडीत तरुणीचा पाठलाग करून, तिच्याशी ओळख करून लग्न करण्याचे अश्वासन देत तिची इच्छा नसताना कान्हूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये जाऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार देत बदनामीकारक मजकूर सोशियल मेडीयावर व्हायरल करत तिची व कुटुंबाची बदनामी केली. तुझा हॉटेलमध्ये काढलेला व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी अनिल नांगरे देत होता. त्याच्या जाचास कंटाळून अखेर पिडीत तरुणीने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे अधिक तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल आरोपी अनिल हा लष्करातील जवान असल्याचे समजते. तो वारंवार सुट्टी काढून गावी येत पिडीतेवर अत्याचार करीत असे.   

Web Title: young woman was lured into marriage and rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here