Home अहमदनगर Ahmednagar News: छिंदम बंधूच्या पोलीस कोठडीत या तारखेपर्यंत वाढ

Ahmednagar News: छिंदम बंधूच्या पोलीस कोठडीत या तारखेपर्यंत वाढ

Ahmednagar News Increase in police custody of Chhindam brothers

अहमदनगर | Ahmednagar News: माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत २४ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. याप्रकरणी अधिक सखोल तपास पोलीस उपअधीक्षक विशाल ढमे हे करीत आहेत.

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकाला दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकाविण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

याप्रकरणी भगिरथ भानुदास बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत २४ सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे.  

Web Title: Ahmednagar News Increase in police custody of Chhindam brothers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here