Home अहमदनगर Accident: विजेचा शॉक लागून तिघा जणांचा मृत्यू, पती पत्नीचा समावेश

Accident: विजेचा शॉक लागून तिघा जणांचा मृत्यू, पती पत्नीचा समावेश

Accident Three die of electric shock

पाथर्डी | Accident: तालुक्यात वीजेचा शॉक लागून दोन विविध घटना घडल्या आहेत. या घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे.

पहिली घटना:  तालुक्यातील माणिकदौंडी  परिसरातील शिंदेवाडी येथील बबन मोहन शिंदे वय ५५ यांच्या अंगावर चालू वीजेची वायर तुटून पडल्याने त्यांचा राहत्या घरा समोर जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. शेतीचे काम करत असताना पाऊस वारा जोरात सुरू होता. त्यावेळी वीजेच्या खांबावरून वीज प्रवाह घरात घेऊन जाणारी केबल अंगावर पडून पडल्याने शॉक लागून शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. शिंदे यांचा मृतदेह दुपारी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.  याप्रकरणी  पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील सांगवी खुर्द  येथील शेतकरी असलेल्या पती पत्नीला सकाळी घरा समोर काम करत असताना वीजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पती पत्नी कामात व्यस्त असताना विजेचा खांबाला स्पर्श झाल्याने खांबाला वीज प्रवाह असल्याने शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला.  या घटनेने  गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत पाथर्डी पोलिसांत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Web Title: Accident Three die of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here