Home Suicide News संगमनेरात बसमध्ये चालक गळफास: मिळालेल्या चिट्ठीतील मजकूर हे आहे कारण

संगमनेरात बसमध्ये चालक गळफास: मिळालेल्या चिट्ठीतील मजकूर हे आहे कारण

Sangamner bus Suicide Case

संगमनेर | Suicide: बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. संगमनेर बस स्थानकात मुक्कामी असलेल्या पाथर्डी बसमध्येच बसचा चालक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

सुभाष शिवलिंग तेलोरे वय ५० रा. पाथर्डी असे या आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बसचे वाहक पोपट साहेबा जावळे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.  यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

मिळालेल्या चिट्ठीतील मजकूर: चालक सुभाष शिवलिंग तेलोरे यांच्याजवळ एक चिट्ठी आढळून आली. त्यात तेलोरे यांनी पैसे घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत. एवढे पैसे मी लोकांचे घेतले आहेत. माझ्या एस टी चे पैसे मिळाल्यावर सगळे पैसे देऊन टाकावे आणि तुम्ही दोघा भावांनी विचाराने राहावे. मम्मीला जीव लावणे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे व राहील. तुम्ही अजिबात घाबरायचे नाही. मी तुम्हाला काही तकलीफ होऊ देणार नाही. सगळ्यांना प्रेमाने वागा. कोणाला उलट सुलट बोलू नये. हिशोब आल्यावर पैसे देतो म्हणावे. असा चिट्ठीतील मजकूर आहे.

Web Title: Sangamner bus Suicide Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here