Home अहमदनगर News: दोन मुलींसह महिला बेपत्ता

News: दोन मुलींसह महिला बेपत्ता

Ahmednagar News Live Woman missing with two daughters

नेवासा |Ahmednagar News Live| Newasa: नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह महिला बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत दि. 22 डिसेंबर 2021 रोजी बापू रामा निकाळजे (वय 55) धंदा- मजुरी रा. चिलेखनवाडी ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यात म्हटले की त्यांची मुलगी शितल विठ्ठल बोरुडे (वय 30) रा. बोधेगाव, ता. शेवगाव ह.मु चिलेखनवाडी ता. नेवासा ही तिच्या दोन मुली राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्षे) व तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 7 वर्षे) या मुलींना घेऊन दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला तरी अद्याप मिळून आलेली नाही.

बेपत्ता महिला शितल विठ्ठल बोरुडे ही रंगाने काळी-सावळी, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे व लांब, गळ्यात काळी पोत, कानात नकली झुबे, उजव्या पायाने अपंग, अंगावर सहावारी लाल रंगाची साडी, मुलगी राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10) ही रंगाने काळी सावळी, नाक सरळ, डोळे तरतरीत, डोक्यास काळे केस हिप्पी कट केलेला, अंगात पांढर्‍या रंगाचा टी शर्ट व लांब पँट, तर दुसरी मुलगी तनवी विठ्ठल बोरुडे (वय 7) ही रंगाने गोरी, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे तरतरीत, डोक्यास काळे केस बारीक, अंगात पिवळ्या रंगाचा ड्रेस असून सर्वाची बोली भाषा मराठी आहे.

सदर वर्णनाची महिला व मुली मिळून आल्यास नेवासा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar News Live Woman missing with two daughters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here