Suicide: अकोले येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोले | Akole | Suicide: अकोले येथील एका २ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुज अनिल वाघ या तरुणाने शनिवारी दुपारी आत्महत्या केली. या आत्महत्यामागचे कारण समजू शकले नाही. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अकोले मेडिकल असोसियशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल वाघ यांचा अनुज हा एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, बहिण असा परिवार आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Young man from Akole commits suicide by hanging