Home संगमनेर टीईटी घोटाळा प्रकरणी डेरे यांच्या संगमनेरातील घराची तीन तास झडती  

टीईटी घोटाळा प्रकरणी डेरे यांच्या संगमनेरातील घराची तीन तास झडती  

Three-hour raid on Dere's house in Sangamner in TET scam case

संगमनेर | Sangamner | TET Scam Case: राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे यांच्या संगमनेर येथील ‘सुखमय’ या निवासस्थानाची काल तब्बल तीन तास झाडाझडती घेण्यात आली. मात्र पोलीस कशासाठी आले होते. त्यांनी काय चौकशी केली याबाबत पोलिसांनी माहिती न देता गुप्तता बाळगण्यात आली.

सोमवारी सकाळीच पुणे येथील पथक रवाना झाले होते, पुणे येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदिर देशमुख यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तात्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्या ‘सुखमय’ निवासाची काल तपासणी केली. टीईटी पेपरफुटी नंतर आता कृषी सेवक पदभरती घोटाळ्याचे धागेदोरे देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीईटी घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. डेरे हे चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून ते संगमनेरातील गुंजाळवाडी अकोले रोड परिसरातील ‘सुखमय’ या बंगल्यात राहत आहे. 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात डेरे हे आरोपी आहेत. त्यावेळी 500 पेपर मध्ये फेरफार झाल्याचा संशय असून यामध्ये आरोपींनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे उघडकीस येत आहे. या घोटाळ्यात अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींचा सहभाग उघडकीस येत आहे. डेरे यांच्यामुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यातील एजंट तपासाच्या रडारवर आले आहेत.

Web Title: Three-hour raid on Dere’s house in Sangamner in TET scam case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here