Home अहमदनगर स्वस्तात सोने देण्याचे आमिषाने आठ लाखास लुटले

स्वस्तात सोने देण्याचे आमिषाने आठ लाखास लुटले

Ahmednagar News lure of giving cheap gold robbed eight lakhs

अहमदनगर | Ahmednagar News: स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल व घडयाळ असा एकूण ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळे कासार शिवारात घडली.

याप्रकरणी संदीप धागे व इतर १० जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. मिलीद कान्हाजी काशीदे (वय 36 रा. बल्लारपुर ता. जि. चंद्रपुर, हल्ली रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) यांनी लुटमार केल्याची फिर्याद दिली आहे.

संदीप धागे याने मिलीद काशीदे व त्यांच्या भावाला स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखविण्यात आले.  अमिषाला बळी पडून मिलिंद काशीदे व त्याचा भाऊ मंगळवारी (दि. २०) सायंकाळी ५:०० वाजता नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात आले. त्याठिकाणी आधीच ८ ते १० जण आले होते. त्यांनी काशीदे यांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, विविध कंपन्यांचे मोबाईल व घड्याळ असा ८ लाख ३४  हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला. काशीदे यांनी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar News lure of giving cheap gold robbed eight lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here