Home अहमदनगर लाचेची मागणी केल्याने ग्रामसेवक व पाणीपुरवठा कर्मचारीविरोधात गुन्हा दाखल

लाचेची मागणी केल्याने ग्रामसेवक व पाणीपुरवठा कर्मचारीविरोधात गुन्हा दाखल

Crime Filed a case against Gram Sevak and water supply staff

राहुरी | Crime: ग्रामसेवकाने घराच्या जागेची दप्तरी नोंद लावण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितल्याने ग्रामसेवकासह पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदराने फिर्याद दिली असून त्यानुसार राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी  येथील गट नंबर ३९ पैकी २ आर घर जागा दुसरी पत्नी हिच्या नावे नोटरी करून दिली होती. सदर जागेची ग्रामपंचायतमध्ये दप्तरी नोंद ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडून करून घेण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी धसाळ याने सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक अभय भाऊराव सोनवणे व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नवनाथ बाळासाहेब धसाळ यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर यांच्यासह सापळा पथक दीपक करंडे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगूल, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, पोलीस नाईक राहुल डोळसे आदींनी  ही कारवाई केली आहे. अधिक तपास  तपास पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे करत आहेत.

Web Title: Crime Filed a case against Gram Sevak and water supply staff

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here