Home अहमदनगर मुलाच्या या एका वाक्याने ६३ दिवस झुंज देणाऱ्या आईने कोरोनाला हरविले

मुलाच्या या एका वाक्याने ६३ दिवस झुंज देणाऱ्या आईने कोरोनाला हरविले

Ahmednagar News mother who had been struggling 

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. याच काळात नगरमधील विमल घायतडक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सीटी स्कॅनचा स्कोअर २५ पैकी २४ आला आणि ऑक्सिजन पातळीही कमालीची खाली आली. अन अशा अवस्थेत ‘आई, तू जगणार, तुला जगलेच पाहिजे. तू खंबीर आहेस,’ असं ते मुलाचे भावूक शब्द खरे करण्यासाठी तब्बल ६३ दिवस कोरोनाशी झुंज देत ठणठणीत बारी होऊन घरी परतली आहे.

एका पोलीस पत्नीची प्रेरणादायक कहाणी: अहमदनगर पोलिस दलातील शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी गणपत घायतडक यांच्या पत्नीची कोरोनावर यशस्वी मात.

२१ एप्रिलला विमल यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तपासणी करण्यात आली. यावेळी विमल ही कोरोनाबाधित आढळून आली. त्यांचे वय ४५ वर्ष आहे. अगोदरच्या काही सह व्याधी आहेच. सीटी स्कॅनचा स्कोअर २५ पैकी २४ त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यानच्या काळात १० मे रोजी विमल यांची प्रकृती जास्तच खालावली होती. त्यांची ऑक्सिजनची पातळी ४५ पर्यंत खाली आली. सगळेच काळजीत पडले होते. अशात त्यांचा मुलगा नितीन त्यांना भेटायला आला. आई, तू जगणार, तुला जगलेच पाहिजे. तू खंबीर आहेस, असं त्याने आईला सांगितलं. याच हिमतीवर विमल करोनाशी लढत राहिल्या. तब्बल ६३ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातील ५३ दिवस त्या व्हेंटीलेटरवर होत्या. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांचा हा लढा यशस्वी झाला.

Web Title: Ahmednagar News mother who had been struggling 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here