Home अहमदनगर उसानंतर दुधाला अच्छे दिन मिळणार आधारभूत किंमत देणारा कायदा

उसानंतर दुधाला अच्छे दिन मिळणार आधारभूत किंमत देणारा कायदा

After that milk will get a good day FRP Rate

मुंबई: आता दुधालाही अच्छे दिवस येणार असे म्हणायला हरकत नाही. शेतकरी व दुध उत्पादकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. दुधाला कायमस्वरूपी चांगला दर मिळावा यासाठी राज्यसरकार आणणार एफआरपी म्हणजेच किमान आधारभूत किमत देणारा कायदा.

राज्यात उसाला एफआरपी कायदा आहे. तसाच दुधाच्या दराबाबत एफआरपी देणारा कायदा केला जाणार आहे. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुधाच्या दराबाबत बैठक पार पडली. दुधाला एफआरपी देणारा कायदा लवकरच केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. या बैठकीला दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, खाजगी आणि सहकारी दुध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात दुध संघांनी दुधाचे भाव पाडले आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दुधाचा दर वाढवून मिळावा यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती.

दुध दराबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या. हेच लक्षात घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाणार आहे. दुधाला एफआरपी देताना दुधाचा उत्पादन खर्च व १५ टक्के नफा मिळावा अशी मागणी यावेळी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दुधाचा उत्पादन खर्च 27 ते 29 रुपये प्रति लिटर आहे. त्यावर 15 टक्के फायदा धरला तर 35 रुपयांच्या पुढे दर निघतो. लॉकडाऊनच्या काळात कमी झालेले दुधाचे दर आठवड्याभरात पूर्ववत करणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web TItle: After that milk will get a good day FRP Rate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here