Home संगमनेर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीसा जारी

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीसा जारी

Pune Nashik High Speed Railway sangamner farmers Notice 

संगमनेर: पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी नवीन दुहेरी मध्यम उच्च वेगवान ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरण व  बांधकामाकरिता जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याची प्रक्रिया संगमनेर तालुक्यात सुरू झाली आहे.

भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, महारेलचे अप्पर महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांच्या नावाने संबंधित गावातील शेतकर्‍यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

पुणे संगमनेर नाशिक हा रेल्वे मार्ग २३५ किलोमीटरचा असून पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतून जात आहे. या मार्गात १८ बोगदे असणार आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा ,ऐलखोपवाडी , खंदरमाळवाडी, नांदूर खंदमाळ, जांबुत, साकूर, जांभुळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपारणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर पोखरी आदी गावांचा समावेश असणार आहे. या गावांतील मोजणी झाली असून गावांतील प्रस्तावित क्षेत्र निश्चित झाले आहे. आता निश्चित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहे त्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहे. आता १५ दिवसांच्या आत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचनांची चौकशी करण्यात येणार आहे.

Web Title: Pune Nashik High Speed Railway sangamner farmers Notice 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here