Home अकोले अकोले तालुक्यातील घटना: लग्नाचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग करून लग्नास नकार

अकोले तालुक्यातील घटना: लग्नाचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग करून लग्नास नकार

Crime News molesting a young woman showing the lure of marriage

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील एका गावात राहत असणारी एका कुटुंबातील महिलेने  मॅट्रीमनीवर रजिस्ट्रेशन करून लग्न ठरविले मात्र आरोपीने पिडीत तरुणीचा घरात घुसून विनयभंग करत लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुधाकर पगारे (पूर्ण नाव माहीत नाही) रा, नाशिक जि नाशिक असे या आरोपीचे नाव आहे.

पिडीत महिलेने  दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीने तिचे लग्न जमविण्यासाठी मॅट्रीमनी या ॲपवर  नाव नोंदणी केली त्यानंतर मॅट्रीमनी ॲपवर फिर्यादी यांची नाशिक येथील एकाशी जणाशी  ओळख झाली तेव्हा त्यांनी त्यांचे नातेवाईक आरोपी सुधाकर पगारे हे फिर्यादीस पाहण्यास आले व लग्नाची तारीख 22/ 6/ 2021 रोजी ठरवून नाशिक येथे लग्न करण्याचे ठरवले होते.  दि 18/6/2021 रोजी दुपारी एक वाजता आरोपी हा फिर्यादीचे घरी आलेला असताना फिर्यादी ही बेडरूम मध्ये गेली असता आरोपी मजकूर याने बेडरुमध्ये येऊन दरवाजा आतून बंद करून फिर्यादीशी झटापट व अंगलट करून फिर्यादीच्या अंगातील कपडे काढण्याचा प्रयत्न करून फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न करून फिर्यादीचा विनयभंग केला तसेच फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून मला तुझ्याबरोबर लग्न करायचे नाही. मी लग्न रद्द केले आहे असे म्हणुन लग्न न करता फिर्यादीची फसवणूक केली. यावरून अकोले पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा .रजी नंबर व कलम 220/2021  भा द वि कलम 354(अ )420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Crime News molesting a young woman showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here