Home अहमदनगर नंदीबैलवाल्यांनी दोन महिलांना घातला ५० हजारांचा गंडा

नंदीबैलवाल्यांनी दोन महिलांना घातला ५० हजारांचा गंडा

Ahmednagar News Nandi bullfighters robbed two women

अहमदनगर | Ahmednagar News: दारात नंदीबैल घेऊन आलेल्या तिघा जणांनी तुमचे भविष्य सांगून सर्व अडचणी दूर करतो असे सांगून एकाच घरातील दोन महिलांना तब्बल ५० हजारांना गंडा घातल्याची घटना घडली आहे,

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नगर शहरातील भिस्तबाग चौकाजवळील कसबेमळा परिसरात हि घटना घडली आहे. याप्रकरणी सविता भारत मवाळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी मवाळ यांच्या दारात नंदीबैल घेऊन तीन जण आले. यावेळी तुमचे भविष्य सांगून वर्तमानातील अडचणी आम्ही दूर करू असे त्यांनी सविता मवाळ व त्यांच्या जाऊ यांना सांगत विश्वास संपादन केला यासाठी मोठी पूजा घालावी लागणार असून त्यासाठी १ लाख ३७ हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. पूजेसाठी मवाळ यांनी त्या तिघांकडे ५० हजार रुपये दिले व पूजेसाठी परत येतो असे सांगितले. मात्र ते तिघे परत आलेच नाही. त्यानंतर मवाळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहे.  

Web Title: Ahmednagar News Nandi bullfighters robbed two women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here