शेतीच्या वादातून महिलेस शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
कोपरगाव | Crime: कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील विवाहित महिलेस शेतीच्या वादातून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला व आरोपी एकाच गावातील असून एकमेकांचे नातेवाईक आहे. त्यांची शेतजमीन एकमेकांजवळ आहे. त्यांचा शेतजमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे.
फिर्यादी महिला व तिची मुलगी बुधवारी घरासमोर बसलेल्या असतांना आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव, अनोख अनिल जाधव, पुष्पा अनिल जाधव, सोनम अनोखा जाधव, पिंकी जितेश जाधव, रिंकी विशाल जाधव, अनिल देवानंद जाधव आदी आठ जणांनी हातात काठ्या घेऊन कोर्टात दाखल असलेल्या शेत वाटपाच्या कारणावरून व तू आम्हाला न विचारता खिडकीचे दुरुस्तीचे काम का केले असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले.
याबाबत प्रमिला जाधव यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Abuse and death threats against women in agricultural disputes crime filed