Home अहमदनगर तरुणांच्या स्विफ्ट कारला अपघात, एक जण ठार चार जखमी

तरुणांच्या स्विफ्ट कारला अपघात, एक जण ठार चार जखमी

Accident Nevasa Young man Of Swift Car

नेवासा | Accident: नेवासा तालुक्यातून भीमाशंकरला गेलेल्या तरुणांच्या स्विफ्ट गाडीला अपघात झाला असून यामध्ये २२ वर्षीय युवा हॉटेल व्यावसायिक अमोल लोखंडे जागीच ठार झाला तर इतर चार जण जखमी झाले आहे.

शुक्रवारी दिनांक १६ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे, मनोज शिंदे, नितीन निपुगे यांच्या सोबत स्विफ्ट कार (एम.एच. ४३ आर ६४२३) ने भीमाशंकर येथे देव दर्शनासाठी गेले होते.

रात्रीच्या साडे आकरा ते बारा वाजेच्या सुमारास प्रवास करीत असताना आळेफाटा ते ओतूर रस्त्यावरील आणे घाटावर पडलेल्या दरडीला ही कार धडकल्याने पुढे जाऊन उलटली. या अपघातात अमोल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील इतर तरुण जखमी झाले. नगर येथील हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर अमोल लोखंडे यांच्यावर शोकाकुल वातावरणातील अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Web Title: Accident Nevasa Young man Of Swift Car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here