Home Accident News Ahmednagar News: वीज कोसळून एक जण  ठार

Ahmednagar News: वीज कोसळून एक जण  ठार

Ahmednagar News One person was killed in a lightning strike

अहमदनगर | Ahmednagar News: जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना टाकळी खातगाव ता. नगर येथे घडली आहे.

या घटनेत भानुदास बाबुराव शेटे हे जागीच ठार झाले आहेत तर गणपत सखाराम पिसे हा गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर भाळवणी ता. पारनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भानुदास शेटे आणि गणपत पिसे हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघेही नेहमीप्रमाणे गुरुवारी शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूला गेले होते. दुपारी साडे तीन वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच पावणे चार वाजेच्या सुमारास वीज कोसळून मोठा आवाज झाला. त्यामुळे या भागातील वीज कोठे पडली हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे मृत्यूमुखी पडले होते. गणपत पिसे जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  

Web Title: Ahmednagar News One person was killed in a lightning strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here