Home अहमदनगर पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

Ahmednagar News Parner Tahsildar Jyoti Devare

पारनेर | Ahmednagar News: पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली  करण्यात आली असून त्यांना तत्काळ, 14 सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. अनियमितताचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जळगाव येथे संजय गांधी योजनेत त्यांच्या बदलीचे आदेश शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी काढले आहेत. शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 4(5) नुसार प्रशासकीय कारणात्सव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्याधिकार्‍यांच्या अहवालानुसार देवरे  यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचे आदेशात म्हंटले आहे.

देवरे यांची ऑडियो क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये आत्महत्येचा विचार व्यक्त केला होता. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यापासून त्रास होत असल्याचे क्लीपमध्ये म्हंटले होते. आमदार लंके व देवरे यांच्यात संघर्षही पेटला होता. तसेच समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मेडीया यामध्ये शासनाची प्रतिमा मलीन करण्यात आल्याने तसेच कामकाजात गंभीर स्वरूपातील अनियमतता केल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनास सादर केला होता. देवरे यांनी पदाचा वापर कार्यक्षेत्राबाहेर जाऊन वापर केला. 

Web Title: Ahmednagar News Parner Tahsildar Jyoti Devare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here