Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार  

अहमदनगर ब्रेकिंग: ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार  

Ahmednagar News Shooting on Gram Panchayat member

नेवासा | Ahmednagar News: नेवासा तालुक्यातील बराणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संकेत चव्हाण हे कांगोनी फाट्यावरून बराणपूर रस्त्याने रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले असता त्याचवेळी दुचाकीहून आलेल्या इसमांनी गावठी काट्यातून संकेत यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. हा गोळीबार राजकीय वादातून की वाळू प्रकरणावरून याबाबत तालुक्यात तर्कवितर्क होत आहे.

या गोळीबाराची माहिती समजताच शेवगाव पोलीस उप विभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पोलीस कसून चौकशी करीत आहे.  

Web Title: Ahmednagar News Shooting on Gram Panchayat member

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here