Home Suicide News विहिरीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या, पर्समध्ये आढळली सुसाईड नोट

विहिरीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या, पर्समध्ये आढळली सुसाईड नोट

Ahmednagar news Teacher commits suicide by jumping into a well

अहमदनगर | Ahmednagar News: नगर शहरातील एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

वंदना रेपाळे असे या शिक्षिकेचे नाव आहे. धनगरवाडी या शाळेत त्या नोकरीला होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.

नगर औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टिमकरे हे त्यांच्या शेतात वीज पंप सुरु करायला गेले असता पाण्यात दुर्गंधी आल्याने पाहिले असता पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना संपर्क करून दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी  पाठविला.

गेल्या ४ दिवसानापासून वंदना बेपत्ता होत्या. तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक नोट पर्स मध्ये लिहून ठेवली होती. नोटमध्ये म्हंटले आहे की, मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे.   

Web Title: Ahmednagar news Teacher commits suicide by jumping into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here