Home अहमदनगर धक्कादायक: शिर्डीत ५ वर्षाच्या बालिकेला म्युकरमायकोसिसची बाधा

धक्कादायक: शिर्डीत ५ वर्षाच्या बालिकेला म्युकरमायकोसिसची बाधा

5 year old girl suffers from mucormycosis in Shirdi

शिर्डी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शिर्डीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अवघ्या ५ महिन्याच्या चिमुकलीला अगोदर करोना झाला होता. आणि आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. इतक्या कमी वयात या आजाराची लागण झाल्याने आरोग्य विभाग हादरला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत रहिवासी आहे. त्यांना दोन मुली आहे. परिस्थिती सामान्यच आहे. लहानी मुलगी ५ वर्षाची आहे. मे महिन्यात या मुलीला जुलाब, उलट्या असा त्रास होत होता. तिला कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाशिक येथे हलविण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात आले. कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली होती. तिचे रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहित कोरोना होऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. तरीही तिला फरक पडत नव्हता. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला.

मुलीच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला नाशिक येथून लोणी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १३ जूनला दाखल करण्यात आले आहे. इतक्या कमी वयात हा आजार झाल्याने डॉक्टरांपुढे आव्हान उभे राहिले आहे.

Web Title: 5 year old girl suffers from mucormycosis in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here