अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांचे राजीनामे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द
अकोले | Akole: अगस्ती कारखान्याच्या सत्ताधा-यांवर विरोधकांकडून सातत्याने होणा-या गैरकारभाराचे आरोपांमुळे व्यथित होऊन कारखान्याचे सर्व संचालकांनी आपल्या पदांचे राजीनामे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले आहे. संचालकच राहणार नसतील तर माझाही राजीनामा तयार असल्याचे सांगून विरोधकांना आता उसउत्पादक आणि सभासदच जाब विचारतील असा ईशारा दिल्याने वारंवार आरोप करणारेच कात्रीत सापडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी बी.जे.देशमुख आणि शेतकरी नेते दशरथ सावंत अगस्तीच्या कारभा-यांवर वारंवार गैरव्यवहाराचे आरोप करीत आहेत. अनेक पत्रकार परिषदा घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे अकोले तालुक्यातील जनतेत पध्दतशीर संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्यानेच आज कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष मधुकरराव पिचड आणि उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी संचालकांसमवेत आरोपांचे खंडन करुन विरोधक कारखाना चालविण्यास सक्षम असतील तर त्यांनी तो चालवावा असे आव्हान दिले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सीताराम पाटील गायकर यांचेसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
Web Title: Akole All the directors of Agasti karakhana resigned