Home अहमदनगर पतीला मारहाण करत विवाहितेचा विनयभंग

पतीला मारहाण करत विवाहितेचा विनयभंग

Beating husband and molesting married woman crime filed

अहमदनगर | Crime: पतीला मारहाण करीत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी राजेंद्र वामन सोनार व संजय वामन सोनार यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व आरोपी यांचे जागेवरून वाद आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शनिवारी रात्री फिर्यादी त्यांचे गोडाऊन पाहण्यासाठी पतीसह गेल्या होत्या. त्यावेळी तेथे आवाज झाला. ते पाहत असताना आरोपी राजेंद्र व संजय सोनार यांच्यासह काही लोक भिंत पाडत असल्याचे समोर आले. फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भिंत पाडणे चुकीचे असल्याचे त्यांना सांगितले. त्याचा राग येऊन फिर्यादी व पतीला संबाधीतानी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केला.

Web Title: Beating husband and molesting married woman crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here