Home अहमदनगर शेतात काम करीत असताना विवाहितेचा सर्प दंशाने मृत्यू

शेतात काम करीत असताना विवाहितेचा सर्प दंशाने मृत्यू

Ahmednagar News Today married woman was bitten by a snake

श्रीरामपूर | Ahmednagar News Today: पुणतांबा चांगदेवनगर येथील कावेरी रवींद्र सांबारे वय ३२ ही महिला शेतात काम करीत असताना विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या सर्पदंशामुळे महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे. कावेरी आपल्या शेतात शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास गवत काढण्याचे काम करीत होती. कामाच्या नादात तिचे खाली लक्ष नव्हते. विषारी सापाने तिला दंश केले. तिच्या सोबत असलेल्या महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उपचार अगोदरच तिचा मृत्यू झाला. तिला चावलेला साप अतिशय विषारी असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. तिचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना नेहमीच अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते. आर्थिक आपत्ती बरोबरच आता त्यांच्या जीवनात बिबट्या व सापांमुळे असुरक्षित वाटू लागले आहे.

Web Title: Ahmednagar News Today married woman was bitten by a snake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here