Home अहमदनगर अहमदनगर हादरले, एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले

अहमदनगर हादरले, एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले

Ahmednagar News Today one family dead bodies found

अहमदनगर | Ahmednagar News Today: सोमवारी सकाळी केडगाव देवी रोडवरील अथर्वनगर येथील ही घटना उघडकीस आली. केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने खळबळ उडाली आजे. यामध्ये आई वडील व १० वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

संदीप दिनकर फाटक वय ४०, संदीप फाटक वय ३२ व मैथिली संदीप फाटक वय १० अशी या मयतांची नावे आहेत. आई वडिलांनी प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यहा देखे: बिझनेस से लाखो कमाई

या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. फाटक हे एक व्यावसायिक होते. व्यवसायात नुकसान झाल्याने खर्चात वाढ झाली होती. याच मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

Web Title: Ahmednagar News Today one family dead bodies found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here