तळ्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू
श्रीरामपूर | Ahmednagar News Today: सोमवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथे एका तळ्यात तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथे सकाळी काही लहान मुले तलवाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. यामधील काही मुले पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने तीन मुले बुडून मयत झाल्याची माहिती समोर येत आहे. या तळ्यात मयत झालेल्या लहान मुलांची वय साधारणतः ७ ते ८ वर्षाचे असल्याचे समजते.
यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे
सदर मुले शेताकडे खेळत असताना अचानक तलावाजवळ गेले आणि पाण्यात उतरले, पोहता येत नसल्याने व तळ्यातील पाणी व खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तीन मुले तळ्यात बुडाली.
याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक साळवे हे दुपारी घटनास्थळी दाखल झाले. या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून याठिकाणी गावकऱ्यानी मोठी गर्दी केली होती. पंचनामा करण्याचे काम सुरु होते. मयत पावलेली मुले ही गरीब कुटुंबातील होती. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Web Title: Ahmednagar News Today Three children drown in pond