Home अहमदनगर दुर्दैवी घटना: दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना: दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

श्रीगोंदा | Ahmednagar News Today: शेततळ्यात‌ पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी चिमुरड्यां मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची  दुर्घटना श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मावळेवस्ती येथील हरी नामदेव कोकरे (वय वर्षे १५) व विरेंद्र रामा हाके (वय वर्षे १६) हे शाळकरी मुले कोरोना काळात शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिर) परिसरात गेले. मंदिर परिसरात पुणे येथील चोपडा यांच्या शेतजमीनीत शेततळे आहे. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले परंतु त्यांना शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला.

सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान फक्त शेळ्या घरी आल्याने कुटुंबीयांनी मुले घरी का आली नाही म्हणून शोधाशोध सुरू केली. घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे व चपला भवानी माता मंदीरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या. त्यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला त्याला बाहेर काढल्यावर तो मृत आढळला तर दुसऱ्याचा शोध घेताना अंधार पडल्याने अडथळा येत होता. परंतु पेडगाव येथील आसिफ शेख व समीर शेख या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन रात्री नऊ-साडेनऊ वाजेच्या सुमारास दुसऱ्यालाही पाण्यातून बाहेर काढले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar News Today Two school children drown in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here