Home क्राईम संगमनेर: पती पत्नी कोविड सेंटरमध्ये असल्याचा फायदा घेत घरफोडी, तीन लाखांचा ऐवज...

संगमनेर: पती पत्नी कोविड सेंटरमध्ये असल्याचा फायदा घेत घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास

Sangamner News pemgiri home theft

संगमनेर | Sangamner News: घरमालक कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून ३ लाख १० हजार रुपयांची चोरी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे घडली आहे.

पेमगिरी येथील पती पत्नी धांदरफळ येथील कोरोना सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल असल्याने त्यामुळे या कुटुंबाने घराला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी याचाच फायदा घेत घराचा दरवाजा तोडला. व घरात घुसून एक लाख २० हजार रुपये रक्कम व सोन्याचे दागिने असा ३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. घराचा दरवाजा तोडला असल्याचे कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी सरपंचाना माहिती दिली. सरपंचांनी चोरीबाबत सदर कुटुंबीयास कळविले. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुनील डुबे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Sangamner News pemgiri home theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here