Home अहमदनगर अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

Ahmednagar News Woman dies after lightning strike

राहता | Ahmednagar News: राहता तालुक्यातील केलवड येथे एका महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी महिलेच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली.

ताई शिवाजी रजपूत वय ३५ रा. केलवड या महिलेचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तिच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या नातेवैकानी तिला राहता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरून राहता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. बी. नरोडे करत आहे.

Web Title: Ahmednagar News Woman dies after lightning strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here