Home अहमदनगर बुडालेल्या तीन मित्रांना वाचविले पण बाहेर येत असताना

बुडालेल्या तीन मित्रांना वाचविले पण बाहेर येत असताना

Ahmednagar News young man Drawn himself

अहमदनगर | Ahmednagar News: विळद घाट ता. नगर येथील केकताई भागात धबधब्याखाली पाण्यात पोहोण्यासाठी गेलेल्या १४ ते १५ युवकांपैकी एका जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

मयूर नरेश परदेशी वय २१ रा. मोची गल्ली तोफखाना असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी तोफाखाना भागातील मोची गल्लीतील १४ ते १५ युवक विळद घाट येथील केकताई धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. धबधब्याखाली असलेल्या पाण्यात युवक पोहत होते. त्यांच्यापैकी तीन युवक बुडण्याच्या परिस्थितीत होते. ते बुडत असताना मयूर परदेशी याने स्वतः चा जीव धोक्यात घालून दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु तिसऱ्या युवकाला पाण्याबाहेर काढत असताना मयूरचा दम तुटला आणि तो स्वतः पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मयूरला मित्रांनी रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्याच्या मृतदेहाचे शवविचेदन केले. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Ahmednagar News young man Drawn himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here