Home अकोले अकोले: बिबट्याच्या हल्ल्यातील मयत शेतमजुराच्या कुटुंबीयास पाच लाखाची मदत

अकोले: बिबट्याच्या हल्ल्यातील मयत शेतमजुराच्या कुटुंबीयास पाच लाखाची मदत

Akole Five lakh assistance to the family of a farm laborer killed in a leopard attack Dhamangaon

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मयत पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबीयास वनविभागाच्या वतीने ५ लाखांची मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

संतोष कारभारी गावंडे हा शेतमजूर धुमाळवाडी येथे शेतकामाला गेला असता आपले काम उरकुन घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने केल्याने त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यानंतर वनविभागाने तातडीने पाठपुरावा करत तातडीने या कुटुंबास मदतीचा पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपयाचा धनादेश आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सीताबाई गावंडे व त्यांच्या वारसांना देण्यात आला.

मयत शेत मजूराच्या कुटुंबियांना १५  लाख मदत वन खात्याकडून देणार असल्याची माहिakoleती अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले यांनी दिली. या घटनेची पहाणी करून पिडीत कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन नाशिकचे मुख्य वनरक्षक नितीन गुदगे व उपविभागीय वनाधिकारी संगमनेर आनंद रेड्डी येल्लो यांनी दिले होते.

Web Title: Akole Five lakh assistance to the family of a farm laborer killed in a leopard attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here