संगमनेरात १६ लाखाच्या साखरेची अफरातफर, परस्पर विक्री
संगमनेर | Crime: संगमनेरमधून खरेदी केलेली १६ लाख ६६ हजार रुपयांची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी न देता दुसऱ्याच व्यापाऱ्याला विकून अफरातफर केल्याची समोर आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण येथील मंजुश्री करवा यांनी संगमनेर येथून साखर खरेदी केली होती. ही साखर प्रकाशचंद ओसवाल या व्यापाऱ्यास पाठविण्यास सांगण्यात आले, मात्र ट्रक चालकांनी ही साखर इतर व्यापाऱ्यांना विकली. ही साखर न मिळाल्याने संभंधित व्यापाऱ्याने चौकशी केली असता साखर मिळाली नसल्याचे त्यानी सांगितले. त्यांनतर त्यांनी ट्रकचालकांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत करवा यांना फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली.
खरेदी केलेल्या साखरेचा अपहार करून ती परस्पर विकल्याचे करवा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी मनोज गोकुळदास मानधने राहणार एरोडळ, जिल्हा जळगाव. वाहन क्रमांक एमएच १८ बीए ५७८७ यावरील चालक, वाहन क्रमांक एमएच ०९ एचएच २४६२यावरील चालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहे.
Web Title: Sangamner 16 lakh sugar scam crime filed