Home अहमदनगर ट्रकचालकास मारहाण करत एक लाख लुटले

ट्रकचालकास मारहाण करत एक लाख लुटले

Ahmednagar One lakh was robbed by beating the truck driver

अहमदनगर | Ahmednagar: गुरुवारी पहाटे नगर औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात एक हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रक चालकावर तीन दरोडेखोरांनी हल्ला करत त्याच्याजवळील १ लाख १० हजार रुपयाची रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक महादेव ताबाजी गीते रा. मिरी ता. पाथर्डी यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महादेव गीते हे ट्रक हॉटेलजवळ पार्क करून आराम करण्यासाठी थांबले तेव्हा पहाटे चोरट्यांनी अचानक हल्ला करीत त्याच्याजवळील पैसे लुटून नेले. याप्रकरणी उपनिरीक्षक पवन सुपनर हे अधिक तपास करीत आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar One lakh was robbed by beating the truck driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here