Home संगमनेर संगमनेर तालुक्यात साडे तीन एकर ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान

संगमनेर तालुक्यात साडे तीन एकर ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान

Burn three and a half acres of sugarcane

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकरी गोरखनाथ काशिनाथ वर्पे, रोहिदास काशिनाथ वर्पे यांच्या शेतातील गाळपासाठी आलेल्या ऊसामध्ये वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीच्या तारांचा स्पार्क होऊन आगीचे लोळ खाली पडल्याने साडे तीन एकर उस शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास जळून खाक झाला आहे. ही घटना घडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,. शेतकरी गोरखनाथ काशिनाथ वर्पे, रोहिदास काशिनाथ वर्पे यांची कनोली शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीमधून विद्युत वितरण कंपनीची मुख्य वाहिनी गेली आहे. तारा एकमेकांना चिकटून आगीचे लोळ तयार होऊन तोडणीस आलेल्या उसावर पडल्याने पाचाटणे पेट घेत आगीने रौद्र रूप धारण केले. ते पाहून वर्पे कुटुंबांनी व तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दलाने प्रयत्न केले.  शेजारी जवळपास ३० ते ४० एकर ऊस होता. आगीवर नियंत्रण आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.    

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka Burn three and a half acres of sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here