Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा पालकमंत्रीपद अजित पवार यांना…

अहमदनगर जिल्हा पालकमंत्रीपद अजित पवार यांना…

Ahmednagar Parent Minister Ajit Pawar Demand

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याचे वारे सुरु आहेत. उस तोड कामगारांचे तसेच जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न सोडविण्यासाठी अहमदनगरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्याची मागणी राज्य उस तोड कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी केली आहे. आपण याबाबत माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत थोरे पाटील म्हणाले, नगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचा कामाचा व्याप अधिक आहे तसेच निवडणुका समोर आल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

नगर जिल्ह्यात उस तोड कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या अजित पवार सोडवू शकतात. त्यांना ग्रामीण भागाची जाण आहे. त्यामुळे ते शेतकरी व कामगार वर्गाचे प्रश्न मार्गी लावतील. त्यामुळे पालकमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात यावे अशी मागणी होत आहे.  

Web Title: Ahmednagar Parent Minister Ajit Pawar Demand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here