Home अहमदनगर पोलीस हवालदारास लाच घेताना लाचलुचपत विभाग पथकाने रंगेहाथ पकडले

पोलीस हवालदारास लाच घेताना लाचलुचपत विभाग पथकाने रंगेहाथ पकडले

Ahmednagar police constable the bribe department team caught 

अहमदनगर | Bribe Case: दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत सुरु ठेऊन त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता वसूल करणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या एका पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्याची कारवाई मंगळवारी केली आहे.

बार्शीकर काळे असे या कारवाई केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून हा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून १५ हजार रुपयांची लाचेची मागणी पोलीस हवालदार काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार २६ एप्रिल २०२१ रोजी लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी याने तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केली. तडजोड अंती १० हजार देण्याचे ठरले. मंगळवारी दिनांक २७ एप्रिल आयोजित सापळा रचत १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष स्वीकारली  असता काळे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: Ahmednagar police constable the bribe department team caught 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here