अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोघांनी केला अत्याचार
जामखेड: जामखेड तालुका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तु माझ्या सोबत आली नाहीस तर आत्महत्या करेन अशी धमकी देऊन साथीदाराच्या मदतीने अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
नितीन अगरचंद खाडे, बाबा दयाराम खाडे दोघेही रा. बाळगव्हाण ता. जामखेड अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यानुसार या दोन्ही आरोपींनी संगनमत करून नितीन खाडे हा संबंधित मुलीला म्हणाला तु माझ्या सोबत चल आली तर तुला उचलून नेईन, तुझ्या बापाच्या घरात औषध पिऊन आत्महत्या करीन असे म्हणून या दोन्ही आरोपींनी मुलीचे तोंड दाबून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. यानंतर आनंदवाडी शिवारातील उसाच्या शेतात नेऊन मुलीच्या ओढणीने तिचे हात पाय व रुमालाने तोंड बांधून दमदाटी केली. नितीन खाडे याने मारहाण करून दोन दिवसांत दोन वेळा अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत पिडीत मुलीने म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील बढे हे करीत आहे.
Web Title: Jamkhed abducted a minor girl and tortured