Home अहमदनगर अहमदनगर: लग्नासाठी अट्टाहास अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी  

अहमदनगर: लग्नासाठी अट्टाहास अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी  

Ahmednagar Pornographic Photo Viral threat

अहमदनगर  | Ahmednagar:  फ्रिफायर या गेम द्वारे ओळख झालेल्या मैत्रिणीकडे लग्नाची मागणी करून धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लग्न न केल्यास तिचे अश्लिल फोटो व्हायरल (Pornographic Photo Viral) करण्याची धमकी देणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात) गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी हा अज्ञात असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

नगर उपनगरात राहणारे फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीची एक वर्षापूर्वी ‘फ्रि फायर’ गेमद्वारे एका तरूणाशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. 25 मे, 2022 रोजी त्या तरूणाने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन करून,‘तुमची मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे, माझे तिच्यावर खूप प्रेम आहे’, असे म्हणून फोन बंद केला. त्यावेळी फिर्यादी यांनी मुलीकडे चौकशी केली असता, ‘आमची मैत्री आहे; पण तो प्रेम असल्याचे म्हणत असून लग्न न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत, असल्याचे पिडीत मुलीने सांगितले.

तरूणाने फिर्यादी यांच्या घरच्या मोबाईलवर फोन केला व म्हणाला,‘तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करून द्या, तुम्ही जर आमचे लग्न लावून दिले नाही तर तुमच्या मुलीची बदनामी करेल, मुलीचे अश्लिल फोटो काढून व्हायरल करेल,’ अशी धमकी दिली. त्याने मुलीचे अश्लिल फोटो काढले असून 25 मे ते 31 मे दरम्यान तरूणाने फिर्यादी यांच्या घरच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Pornographic Photo Viral threat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here