Home अहमदनगर Crime: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

Crime: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

crime filed against MLA Gopichand Padalkar in Karjat

Ahmednagar | कर्जत | Karjat Crime: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील धनगर समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर रवींद्र पांडुळे, अंगद रूपनर, महेश काळे, विजय पावणे, तानाजी पिसे, सागर मदने, चंद्रकांत खरात व लहू रूपनर यांच्या सह्या आहेत.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत तालुक्यातील बेनवडी फाटा व चापडगाव येथे मंगळवार, 31 मे रोजी नागरिकांशी व प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व आ. रोहित पवार यांच्यासह चौंडी येथे आलेल्या अनेक मंत्री व इतर व्यक्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरले. यामुळे त्यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले म्हणून भादवि कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे.

Web Title: crime filed against MLA Gopichand Padalkar in Karjat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here